Showing posts from June, 2025Show all

सांगोला फॅबटेक महाविद्यालयात (स्वायत्त) "अभ्यासक्रम आधारित कार्यशाळा" संपन्न

फॅबटेक मध्ये उद्या पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात

सांगोला फॅबटेक पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे संगीत परीक्षेत यश

*पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारचे ज्ञान आत्मसात करा- भाऊसाहेब रूपनर* *फॅबटेक विद्यार्थ्यांचे अकोला मध्ये "विशेष श्रम संस्कार शिबीर"* सांगोला: प्रतिनिधी देशाचा जबाबदार नागरीक म्हणून विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्य करणे गरजेचे आहे. समाजासाठी गावासाठी सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे. या गावात डिजिटल साक्षरता अभियान, सामाजिक अडी-अडचणी लक्षात घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गावातील नागरिकांना स्वच्छतेच महत्त्व पटवून द्या. वृक्षारोपण, नदी स्वच्छता आदींसह अनेक कार्यक्रम या शिबिराच्या माध्यमातून राबवत असताना विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्काराचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी बोलताना व्यक्त केले. फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मधील विद्यार्थ्यांचा अकोला (ता. सांगोला) येथे मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, सरपंच धनश्री गव्हाणे, प्रमुख पाहुणे शहाजी गडहिरे, स्टुडंट डिन डाॅ. संजय पवार आदींच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा अकोले ग्रामपंचायतच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहूल पाटोळे यांनी केले. या शिबिरामध्ये पोलीस पाटील गणेश खटकळे, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे आदींनी उपस्थितांना संबोधित केले. या शिबिरामध्ये प्रा. ज्योती शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. राहूल पाटोळे, प्रा. चैञाली धुमाळ, अझर तांबोळी, प्रशांत गोडसे, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी प्रतिनिधी अन्नुर मुलाणी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुमारी अर्पिता शिंदे हिने केले

अहिल्यादेवीच्या क्रांतिकारी विचारांची समाजाला गरज- प्रा. प्राजक्ता रूपनर