सांगोला फॅबटेक महाविद्यालयात (स्वायत्त) "अभ्यासक्रम आधारित कार्यशाळा" संपन्न

 


सांगोला: प्रतिनिधी

  फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (स्वायत्त) मध्ये शनिवार दिनांक २१ जुन २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे यांच्यावतीने राष्ट्रीय शिक्षण धोरणे २०२५-२६ अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित विविध विषयांच्या प्राध्यापकांची एकदिवसीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर यांनी दिली.

     फॅबटेक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. संदिप माळी, डॉ. पंकज आवटे, डॉ. दिपक क्षीरसागर, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. संजय अंकुशराव, डॉ. मोहन ठाकरे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रूपनर म्हणाले, सांगोला फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाने अभियांञिकी शिक्षण क्षेत्रात फॅबटेक महाविद्यालयाने मोठे पाऊल टाकले आहे. महाविद्यालयामध्ये एखादा नवीन अभ्यासक्रम सुरू करायचा असेल तर किमान एक वर्षाचा काळ लागतोच त्यासाठी बोर्ड ऑफ स्टडीज, ॲकेडमिक काउन्सिल, मॅनेजमेण्ट काउन्सिल, सिनेट, बीसीयुडी, फायनान्स कमिटी, एक्झामिनेशन कमिटी अशा लांबलचक प्रक्रियेतून जावंच लागतं. शैक्षणिक स्वायत्तता किंवा 'ॲकॅडमिक ऑटोनॉमी' हाच त्याच्यावर उत्तम उपाय आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि स्वायत्ततेच्या दिशेने केलेल्या वाटचालीचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला. या कार्यशाळेत सहभागी बोर्ड ऑफ स्टडीज प्रतिनिधींनी अभ्यासक्रमावर सुचना करून मार्गदर्शन केले. याशिवाय डीन अ‍कॅडमिक डॉ. अनुप विभुते यांनी द्वितीय व ते अंतिम वर्ष अभ्यासक्रम रूपरेषा सादर केली. तसेच कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील बोर्ड ऑफ एक्झामिनेशन चे प्रमुख डॉ. ए. एन जाधव यांनी अभ्यासक्रम व परीक्षा याबद्दल महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

  या कार्यशाळेत डॉ. शरद पवार, डॉ. सोमनाथ ठिंगळे, प्रा. शिवानंद माळी, प्रा. राहूल आवताडे आदींनी प्रथम वर्ष ऑटोनॉमस (स्वायत्त) अभ्यासक्रमांवर विभागवार सादरीकरण केले. या कार्यशाळेत गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड, राजाराम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तसेच इन्फोसिस पुणे, कॅपजेमिनी बंगलोर, सर्वेन ग्लोबल सोल्युशन चेन्नई, येझाकी, हर्मन इंटरनॅशनल आदी मल्टिनॅशनल कंपनीतील ४२ हून अधिक तज्ञांनी सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले.

    हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डॉ. संजय पवार, डॉ. तानाजी धायगुडे, प्रा. ज्योती शिंदे, प्रा. हणमंत मल्लाड, डॉ. हरिदास पवार, डॉ. तृप्ती बनसोडे, प्रा. धनंजय शिवपुजे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेचे सुञसंचालन प्रा. जयश्री मदने यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सोमनाथ ठिंगळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.