सांगोला: प्रतिनिधी
भारतीय इतिहासातील महत्वाची व्यक्ती म्हणून अहिल्यादेवी होळकर यांना ओळखले जाते. १८ व्या शतकात मराठा साम्राज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर यशस्वीपणे पेलून केवळ देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यकारभार कसा करावा याचा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी जगाला आदर्श घालून दिला आहे. छत्रपती शिवरायांप्रमाणेच आपल्या जनतेची तितक्याच प्रामाणिकपणे सेवा करून प्रजाहितास नेहमीच प्राधान्य अहिल्यादेवी होळकर यांनी दिले म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या क्रांतिकारी विचारांची समाजाला आजही गरज असल्याचे प्रतिपादन फॅबटेक टेक्निकल कॅम्पसच्या व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर यांनी फॅबटेक मध्ये बोलताना व्यक्त केले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे पुजन संस्थेचे कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे, इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, ग्रंथपाल सुधीर माळी, अकाउंट प्रमुख सुनिल टाकळे आदींसह च्या हस्ते पुजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार उपस्थितांच्या समोर आपल्या मनोगताच्या माध्यमातून मांडला. हा कार्यक्रम फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील अकॅडमिक डीन डाॅ. शरद पवार, स्टुडंट डिन प्रा. संजय पवार, प्रथम वर्ष अभियांञिकी विभाग प्रमुख प्रा. ज्योती शिंदे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी, प्रा. वाघेशा मथडा, विद्यार्थी प्रतिनिधी अन्नुर मुलाणी आदींसह कॅम्पस मधील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अमोल पोरे यांनी केले.