सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील ३ विद्यार्थ्यांनी मुंबई येथील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने एप्रिल-मे सञात घेण्यात आलेल्या परीक्षेत सांगोला येथील फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत असलेला कुमार जगदीश गोरख खताळ प्रथम क्रमांक तर इयत्ता नववी मध्ये शिकत असलेल्या मयुरेश महेश राऊत यांनी गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय इयत्ता आठवी मधील कुमार वेदांत प्रविण कवडे या विद्यार्थ्यांने हार्मोनियम वादक म्हणुन उत्कृष्ट क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले आहे.
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच शाळेतील विद्यार्थ्यांनी संगीत क्षेत्रात प्राप्त केलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे मत प्राचार्य सिकंदर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना व्यक्त केले
संगीत परीक्षेत यश प्राप्त केल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील, सुपरवायझर वनिता बाबर आदींसह फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेची मान उंचावली आहे. हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि शिक्षकांच्या समर्पणाचे फळ आहे. आम्ही भविष्यातही संगीत क्षेत्रात असेच यश मिळवण्यासाठी कटिबद्ध आहोत. संगीत ही एक साधना आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी ही साधना मनापासून केली आहे. त्यांचे हे यश आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
श्री. सिकंदर पाटील
प्राचार्य
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला