लक्ष्मी दहिवडी: प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील स्वाती धोंडिराम कडलासकर ह्या सांगोला येथील जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा उपविभाग कार्यालयात शिपाई या पदावरून पंचायत समिती मध्ये कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला.
सांगोला पंचायत समिती मधील शिक्षण विभागात कनिष्ठ सहाय्यक पदी पदोन्नती झाल्याबद्दल स्वराज डेव्हलपर्स संस्थापक अध्यक्ष शिवराज भाऊ म्हेञे, उद्योजक बंडू दादा बनसोडे, सत्यशोधक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय देवमारे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोदराजे बनसोडे, शुभांगी वाघमारे आदींनी त्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.