सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च मध्ये शुक्रवार दिनांक ६ जुन २०२५ रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.
शिवराज्याभिषेक या दिनाचे औचित्य साधून छञपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन प्रा. मयुर राजमाने यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच इंजिनिअरिंग काॅलेजच्या उप-प्राचार्य डॉ. विद्याराणी क्षीरसागर, प्रा. ज्योती शिंदे, डॉ. सोमनाथ ठिगळे, प्रा. हणमंत मल्लाड यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान प्रा. मयुर राजमाने यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. गणेश हुंडेकरी, प्रा. गजानन काळे, प्रा. धनंजय शिवपुजे, प्रा. आतिश जाधव, प्रा. अमोल मेटकरी, ग्रंथपाल प्रा. सुधीर माळी आदी कॅम्पस मधील विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमाचा सुञसंचलन व आभार प्रदर्शन विद्यार्थी कुमार नागराज बिराजदार यांनी केले.