फॅबदीपोत्सव फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये साजरा

 



सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये फॅबदीपोत्सव उत्साहात साजरा झाला.

 जीवनातील तिमिराचा नाश करून मन गाभारा आशेच्या प्रकाशाने उजळून टाकणारी ही पणती अस्तित्व छोटे असले, तरी जीवनाच्या वाटा तेजोमय करून जगण्याचा मार्ग आणि नवीन उमेद जागवणारी ही पणती साऱ्यांच्याच हृदय स्थानी असते, अशा दिव्यांच्या सणांचा उत्सव फॅबदीपोत्सवाचे आयोजन फॅबटेक पब्लिक स्कूलने केले होते .या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील ए.ओ. वर्षा कोळेकर सुपरवायझर सौ वनिता बाबर,संस्कृतिक विभाग प्रमुख श्री संजय देशमुख, पालक प्रतिनिधी श्री. अलूरकर हे होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महालक्ष्मी, गायवासरू पूजन करून फॅबदीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण हनुमान यांच्या वेशभूषा सादर केल्या.स्कूलचे शिक्षक श्री.दयानंद चांडोले सरांनी इकोफ्रेंडली दिवाळी बद्दल माहिती दिली. कु.प्रियंका मोहिते यांनी दिवाळी सण व ऋतू यांची माहिती दिली.,तर डॉ अमोल रणदिवे सरांनी दिवाळी सणाच्या प्रत्येक दिवसाची शास्त्रशुद्ध माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.तसेच श्री.दयानंद चांडोले सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हिंदी मधून सुंदर लघूनाटीका सादर केली.

डॉ. अमोल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळी पहाट गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. तर श्री आतिश बनसोडे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. 

यानंतर प्रशालेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदील, शुभेच्छापत्र, मंगलतोरण, पणती सजावट तयार करून दिवाळीची भेट शिक्षकांना व विद्यार्थी मित्रांना दिली. यानंतर येलो हाऊस ने सिंधुदुर्ग किल्ला, ब्लूहाऊसने शिवनेरी किल्ला,,ग्रीन हाऊसने तोरणा किल्ला,रेड हाऊसने मुरूड जंजिरा किल्ला बांधणीचा आनंद घेतला. सामाजिक कर्तव्य व दिवाळी सण हा आनंदाचा सण म्हणून स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मातोश्री वृद्धाश्रमातील वयोवृद्ध आजी आजोबांना दिवाळीसणाचे साहित्य देऊन सामाजिक कर्तव्य पार पाडले.

या दीपोत्सव कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर ,कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर ,कॅम्पस डायरेक्टर डॉ .संजय अदाटे, प्रशालेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या दीपोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यी अनुक्रमे पार्थ चोरमुले,दक्ष कोळेकर, वेदांत कळमकर,श्लोक पतंगे,प्रांजली लिगाडे अधीराज शिंदे, शाश्वत अवताडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.