सांगोला: प्रतिनिधी
गणितीय कौशल्य आत्मसात करीत आपली अंगभूत क्षमता विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरापासून आजचे विद्यार्थी अबॅकसच्या माध्यमातून गणितामध्ये प्राविण्य मिळवताना दिसत आहे. सांगोला फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना अबॅकस या गणित पद्धतीचे शिक्षण दिले जात असुन या संदर्भात घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
इन्स्पायर अबॅकस यामध्ये प्रथम क्रमांक आर्यन अभिजीत नलवडे व तृतीय क्रमांक आसावरी अमोल नलवडे यांनी मिळवला आहे. रिजनल लेवल प्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेकंड लेवल मध्ये तृतीय क्रमांक श्रेया खंडू जगताप व उत्कृष्ट सादरीकरणासाठी आयुष खंडू जगताप व पाचवा क्रमांक श्रेया दत्तात्रय शिंदे यांना मिळाला आहे. झिरो लेवल मध्ये चौथा क्रमांक श्रेयश दत्तात्रय शिंदे व उत्कृष्ट सादरीकरणासाठी अर्णव प्रवीण कवडे यांना मिळाला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कूल मधील सीईओ सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील, सुपरवायझर वनिता बाबर आदींसह स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.