सांगोला: प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, स्वातंत्र्य लढ्यातील आद्य प्रवर्तक पञकार, लेखक, वक्ते स्वातंत्र्य सेनानी म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीनिमित्त तसेच साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य सिकंदर पाटील, सुपरवायझर वनिता बाबर, शिक्षक पंचाक्षरी स्वामी आदींच्या हस्ते करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये इयता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेले कुमार तन्मय गणेश चंदनशिवे, सातवी मधील कुमारी सानवी सोमनाथ कटप आणि इयता आठवी मधील कुमार वेदांत प्रविण कवडे आदी विद्यार्थ्यांनी भाषण करून अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले.
हा कार्यक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, स्कूलच्या सीईओ सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका भारती जुंदळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.