□ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ३.३६ लाख पॅकेज
सांगोला: प्रतिनिध
देशातील विविध नामांकित कंपनीत सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. फॅबटेक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत असून "टीसीएस" कंपनीत आगलावेवाडी (ता. सांगोला) येथील धनराज हाके यांची टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.
"टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून "टीसीएस" चा उल्लेख केला जातो.
अशा या "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" कंपनीत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागामध्ये अंतीम वर्षात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेले धनराज हाके यांची "टीसीएस" कंपनीकडून मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीतून त्यांची निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ३.३६ लाख पॅकेज मिळणार आहे.
टीसीएस कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्लेसमेंट समन्वयक प्रा. आतिश जाधव आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.