□कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ४.२० लाख पॅकेज
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात अभियांञिकीचे शिक्षण घेतलेल्या ४ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कॅपजेमिनी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विविध संधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे कौशल्य व गुणात्मक दर्जा वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाच्या आधारे फॅबटेक इंजिनिअरिंग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेले वडदेगाव (ता. मोहोळ) येथील कुमारी अंजली मारुती वराडे, सोलापूर येथील कुमारी निसर्ग नामानंद फसगे, सोणंद (ता. सांगोला) येथील कुमारी दीप्ती लालासाहेब कोडग आणि सांगोला येथील कुमारी साक्षी भारत बनसोडे या चार विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली आहे. कॅपजेमिनी कंपनीकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४.२० लाख पॅकेज मिळणार आहे.
कॅपजेमिनी कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, संगणक विभागातील प्लेसमेंट समन्वयक प्रा. आतिश जाधव आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.