सांगोला: प्रतिनिधी
ग्रामिण भारताचा विकास ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामपंचायत अधिकारी सचिव या नात्याने पाहत असतो. ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद करत असते. फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेलेले नळगीर (ता. उदगीर) येथील जगदीश श्रीकांत नळगीरकर यांची ग्रामपंचायत अधिकारी पदी निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात अभियांञिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा संदर्भात नामांकित व्याख्याते यांचे मार्गदर्शन करण्यात येते. याशिवाय महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून देण्यात येते. या माध्यमातून अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा अभ्यास करून उज्ज्वल यश संपादन करत आहे.
अमरावती जिल्हा परिषदच्या वतीने २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या पंचायत राज परीक्षेत नळगीर (ता. उदगीर) येथील जगदीश श्रीकांत नळगीरकर यांनी उज्ज्वल यश संपादन करून अमरावती जिल्ह्य़ातील नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समिती मधील सिद्धनाथपुर या गावात ग्रामपंचायत अधिकरी या पदावर कार्यरत आहेत.
जगदीश श्रीकांत नळगीरकर यांची यापूर्वी फॅबटेक काॅलेज मधुन फॅबटेक उद्योग पुणे (भोसरी) येथील कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणुन निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच अभ्यास करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद प्राप्त केले आहे.
जगदीश नळगीरकर यांच्या निवडीबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. राहूल औताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.