सांगोला फॅबटेक मधील २ विद्यार्थ्यांची "स्पार्काॅन टेक्स्टाईल प्रा. लि." कंपनीत निवड

 




सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमार रितेश गायकवाड आणि अनिल तोडकर यांची "स्पार्काॅन टेक्स्टाईल प्रा. लि." कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.

     "स्पार्काॅन टेक्स्टाईल प्रा. लि." कंपनी भारतातील खाजगी कंपनी आहे. वस्त्र आणि कपड्यांच्या उत्पादन तसेच व्यापारा मध्ये हि कंपनी कार्यरत आहे. या कंपनी मध्ये पुरूष व महिलांची कपडे तयार करणे, तयार केलेल्या कपड्याचा पुरवठा करणे याशिवाय ठोक व्यापार मध्ये हि कंपनी केंद्रित आहे. कंपनी सद्या टेक्स्टाईलच्या होलसेलिंग आणि कपडे तयार करण्यावर भर देत आहे. अशा कंपनीत फॅबटेक महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच कुमार रितेश गायकवाड आणि अनिल तोडकर यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम पाहत आहेत

     "स्पार्काॅन टेक्स्टाईल प्रा. लि." कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.