सांगोला: प्रतिनिधी
'शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शनिवार दि.२६ जुलै २०२५ पासून ते सोमवार, दि.२८ जुलै २०२५ पर्यंत म्हणजेच एकूण तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६७५६) मध्ये ऑनलाईन ऑप्शन फॉर्म भरण्याची सोय मोफत करण्यात आली आहे. या पहिल्या प्रवेश फेरीची अलॉटमेंट यादी अधिकृत संकेतस्थळावर गुरुवार दि. ३१ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. ज्यांनी पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन केले त्यांना या प्रवेश फेरीचा लाभ घेता येणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, भरलेले अर्ज स्विकारुन कागदपत्रांची तपासणी, पडताळणी, व निश्चिती करणे आदी प्रक्रिया पूर्ण झाल्या असून तात्पुरती गुणवत्ता यादी १९ जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे. गुरुवार दि. २४ जुलै २०२५ रोजी अंतिम गुणवत्ता यादी शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे. त्यानंतर पहिली फेरी (फर्स्ट कॅप राऊंड) चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया शनिवार दि. २६ जुलै पासून ते सोमवार दि.२८ जुलै या दरम्यान होणार आहे. या पहिल्या फेरीमध्ये योग्य आणि पसंतीचे महाविद्यालय अथवा योग्य ब्रँच बाबतचे पसंतीक्रम ऑनलाईन भरावे लागणार आहेत. यासाठी विद्यार्थी व पालकांनी पूर्णपणे अभ्यास करून कॅप राऊंड-१ चे ऑप्शन फॉर्म भरणे अत्यंत गरजेचे आहे. महाविद्यालय निवडताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात दरवर्षी होणारे प्रवेश, उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, मानांकने याशिवाय ऑटोनॉमस (स्वायत्ता) काॅलेज आदी महत्वाच्या बाबींचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून करिअरच्या दृष्टीने योग्य महाविद्यालयाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. पहिल्या प्रवेश फेरीचे जागावाटप (अलॉटमेंट) दि. ३१ जुलै रोजी प्रदर्शित केले जाणार आहे. पहिल्या फेरीच्या जागा वाटपानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुक्रवार दि. ०१ ऑगस्ट ते दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करावी लागणार आहे. प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेबाबत काही अडचण निर्माण झाल्यास प्रा. राजकुमार गावडे (८४०८८८८५०४) आणि प्रा. आशिष जोशी (९५११८५८३९७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने करण्यात आले आहे.