सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण पुर्ण केलेले कुमारी स्नेहल खेडेकर हिची क्वालिटी किस्को प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.
"क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि. कंपनी कार्यप्रदर्शन अभियांत्रिकीत मध्ये अग्रणी आहे. या कंपनीचे दोन हजार प्लस गुणवत्ता आश्वासन सल्लागार भारत, दुबई, मलेशिया, इंडोनेशियन, फिलिपिन्स आणि सिंगापूर आदींसह २० देशांमध्ये "क्वालिटी किस्को टेक्नॉलॉजीज प्रा. लि." कंपनी कार्यरत आहे. अशा या कंपनीत फॅबटेक कॉलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील कुमारी स्नेहल खेडेकर हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
देशातील व परदेशातील नामांकित कंपन्यांना आवश्यक असलेले परफेक्ट इंजिनिअर हे फॅबटेक काॅलेज ऑफ इंजिनिअरींग सांगोला मध्ये घडविले जातात. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, गुण यांचा समन्वय साधून फॅबटेक महाविद्यालय विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण व प्लेसमेंटची तयारी करून घेते. यामुळेच फॅबटेक इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.
क्वालिटी किस्को प्रा. लिमिटेड कंपनीत कुमारी स्नेहल खेडेकर हिची निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्य डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.