प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेश रजिस्ट्रेशन साठी दुसर्‍यांदा मुदत वाढ

 


सांगोला: प्रतिनिधी

शैक्षणिक वर्षे २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाकरिता आवश्यक असणाऱ्या ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया कक्ष मुंबई यांच्याकडून सोमवार १४ जुलै २०२५ पर्यंत मुदत वाढत देण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.

    अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छित अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्र व प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध झाली नसल्याने प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी च्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला शासनाकडून मुदतवाढ दिली असून सुधारीत वेळापत्रकानुसार सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ पर्यत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे.

  फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असते. प्रथम प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली मूळ कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या विभागाकडून विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष अभियांत्रिकी रजिस्ट्रेशन दिनांक १४ जुलै २०२५ सायंकाळी ५ वा. पर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. कागदपत्र व्हेरिफिकेशन मंगळवार दि. १५ जुलै २०२५ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत करता येणार आहेत.

  तरी रजिस्ट्रेशन साठी येताना आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल नंबर सोबत असणे आवश्यक आहे.

   अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी प्रा. राजकुमार गावडे (८४०८८८८५०४) आणि प्रा. आशिष जोशी (९५११८५८३९७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग काॅलेजच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.