लक्ष्मी दहिवडी: प्रमोद बनसोडे
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची ७३० व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.
प्रत्येक वर्षी प्रमाणे याहीवर्षी लक्ष्मी दहिवडीतील संत सावता माळी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज सकाळी पहाटे काकड, आरती उद्या गुरुवार दिनांक १७ जुलै २०२५ ते बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण , १२ ते ४ भंजन , सायंकाळी ७ ते ८ दररोज वेगवेगळ्या महाराजांचे प्रवचने तसेच राञी ९ ते ११ वेगवेगळ्या महाराजांचे हरी कीर्तने होणार आहेत.
संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवार दि. १७ जुलै रोजी लक्ष्मी दहिवडीत श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात होणार आहे.
या सप्ताहाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. रामेश्वर महाराज इंगळे हे असणार तर मृदंग वादक ज्ञानेश्वर महाराज डांगरे तसेच हा सप्ताह संतोष महाराज निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
२३ जुलै रोजी सायंकाळी श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पवृष्टी करून प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. २४ जुलै रोजी सकाळी ९ ते ११ हभप पांडूरंग महाराज साळुंखे यांचे काल्याचे किर्तन होणार असुन महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम होणार असुन या सप्ताहाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.