*फॅबटेक मधील प्रकाश माने यांची "केअर पाॅवर गॅस प्रा. लि. कंपनीत निवड*
□ कंपनीकडून वार्षिक ९.४५ लाख पॅकेज: उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी माहिती
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात शिक्षण घेतलेले शेगाव (ता. जत) येथील प्रकाश माने यांची "केअर पाॅवर गॅस प्रा. लि. कंपनीत निवड कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.
"केअर पाॅवर प्रा. लि. कंपनीची मुंबई येथे स्थापना १७ डिसेंबर १९७३ साली झाली असुन ही कंपनी केअर सोल्युशनची उपकंपनी आहे. उर्जा निराकरण प्रदान करणारी हि आहे. याशिवाय भारतात केअर पाॅवर गॅस अभियांञिकी आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करणारी हि कंपनी आहे. यामध्ये तेल आणि गॅस, नवीन उर्जा आदींचा समावेश आहे. अशा या कंपनीत फॅबटेक कॉलेज मधील प्रकाश माने यांची निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ९.४५ लाख पॅकेज मिळणार आहे. फॅबटेक काॅलेज मधील दर्जेदार शिक्षण पद्धतीमुळे आज फॅबटेक मधील अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत निवडले जात आहेत.
"केअर पाॅवर प्रा. लि." कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्य डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.