सांगोला । प्रतिनिधी
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी मध्ये औषधनिर्माणशास्त्र डी. फार्मसी, बी. फार्मसी व एम. फार्मसी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी फॅबटेक काॅलेज मध्ये थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्ज सुविधा केंद्र (फॅसिलिटेशन सेंटर) उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी प्रवेश बाबत फॅबटेक काॅलेज मध्ये मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारे गुणपत्रके, प्रमाणपत्रे, इतर कागदपत्रे आणि संपूर्ण प्रवेशप्रक्रियेबदल सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे.
फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये डी. फार्मसी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी पदवी प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दिनांक ०४ जुलै २०२५ ते १६जुलै २०२५ या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती दि. १८ जुलै २०२५ या कालावधीत होणार आहे आणि दि. २० जुलै २०२५ ला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि दि. २५ जुलै २०२५ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे
डी. फार्मसी द्वितीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज अथवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://dsp2025. mahacet.org या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. सांगोला फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चिती करता येणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी फॅबटेक काॅलेज मधील सुविधा केंद्रावर येताना आपले सर्व मुळ कागदपत्रे, दोन प्रति झेरॉक्स व फोटो सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. खुला प्रवर्गासाठी हजार रुपये तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आठशे रुपये प्रवेश प्रक्रिया शुल्क ऑनलाईन नेट बँकिंग द्वारे किंवा एटीएम कार्ड द्वारे महाराष्ट्र शासनाकडे भरणा करायचा आहे. तरी फॉर्म भरण्यासाठी फॅबटेक काॅलेज मधील सुविधा केंद्रावर येताना एटीएम कार्ड घेऊन येणे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी, सखोल मार्गदर्शन, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांमार्फत मोफत देण्यात येत आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी मधील डाॅ. सरफराज काझी ९०९६०८४२२८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी च्या वतीने करण्यात आले आहे.