सांगोला: प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये बी फार्मसी साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.
पीसीआय नवी दिल्ली व तंञ शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन प्रान्यता प्राप्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्ञ विद्यापीठ, लोणेरे संलग्न फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी सांगोला महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षांत बी फार्मसी साठी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. बी फार्मसी साठी विद्यार्थी विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक परीक्षा १२ वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र आरोग्य आणि तांञिक सामान्य प्रवेश चाचणी एमएचटी-सीईटी २०२५ अथवा राष्ट्रीय पाञता कम प्रवेश चाचणी २०२५ नीट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बी फार्मसीचा अभ्यासक्रम हा ४ वर्षाचा असणार आहे. बी फार्मसी च्या प्रवेशासाठी काॅलेज कोड ६९३७ असा असुन चाॅईस कोड ०६९३७८२३१० असा आहे. फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात मोफत रजिस्ट्रेशन (सुविधा केंद्र) म्हणून मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र स्टेट काॅमन एंट्रेंस टेस्ट सेल कडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी फार्मसी (बॅचलर ऑफ फार्मसी) साठी दि. ७ जुलै २०२५ ते दि. १४ जुलै २०२५ या कालावधीत रजिस्ट्रेशन करता येणार आहे. दि. २३ जुलै २०२५ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे आणि समुपदेशन ची सुरवात हि ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
बी फार्मसी प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र, १० वी व १२ वी मार्कशीट, वय अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), आधार कार्ड आवश्यक आहे.
प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. बी फार्मसी च्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रिये बाबतचे सखोल मार्गदर्शन हे फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी मध्ये अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन देण्यात येत आहे. बी फार्मसी च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी प्रा. अमोल पोरे ९५११६४४३३६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.