सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया आज शनिवार, दि. ४ जुलै २०२५ पासून सुरु झाली असुन ही ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया १५ जुलै २०२५ सायं. ५ वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध असुन या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन करणेसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
या वर्षी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी व कन्फर्मेशन करण्यासाठी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्ट्रेशन व कन्फर्मेशन नंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे, प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी प्रक्रिया होतील. थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी) च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महाविद्यालयातील डाॅ. संजय पवार ९५५२९१९०१७ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन फॅबटेक काॅलेज च्या वतीने करण्यात आले आहे.