फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थी प्रतिनिधींचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

 

सांगोला: प्रतिनिधी 

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण करताना त्यांच्यामध्ये लोकशाही मूल्यांची रुजवणूक करण्यावर भर दिला जातो. या पार्श्वभूमीवर स्कूल मध्ये बुधवार दिनांक ९ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.

     फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी कौन्सिलचा पदग्रहण सोहळा व शपथविधी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माझी सैनिक रावसाहेब साळुंखे आणि उत्तम चौघुले हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या सुरवातीस कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, प्रमुख पाहुणे रावसाहेब साळुंखे, उत्तम चौघुले, फॅबटेक फाउंडेशनच्या संचालिका सुरेखा रूपनर, स्कूलच्या सीईओ सारीका रूपनर यांचे स्कूलच्या वतीने प्राचार्य सिकंदर पाटील यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

    यादरम्यान प्रमुख पाहुणे माजी सैनिक रावसाहेब साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचा म्हणून टीम कशा प्रकारे पुढे घेऊन जाणे आवश्यक असते. स्वतःमध्ये ध्येय असले पाहिजे. ध्येय असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नसल्याचे मत रावसाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले. तसेच माजी सैनिक उत्तम चौघुले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.

   चालू शैक्षणिक वर्षांकरिता हेडबाॅय ग्रीन हाउस कुमार साईराज जानकर, हेडगर्ल्स रेड हाउस कुमारी सृष्टी सावंत, ग्रीन हाऊस कॅप्टन कुमार यश भोसले व्हाईस कॅप्टन आरूष लवटे, रेड हाऊस कॅप्टन कु. मयंक शिंदे, व्हाईस कॅप्टन कुमार ओंकार खरात, यलो हाऊस कॅप्टन कुमार श्री कोळेकर, व्हाईस कॅप्टन कुमार प्रेम सुळे, ब्लू हाऊस कॅप्टन कुमार हिमांशू येडगे, व्हाईस कॅप्टन कुमारी सानवी बाबर आदी नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, माजी सैनिक रावसाहेब साळुंखे व उत्तम चौघुले आणि प्राचार्य सिकंदर पाटील यांचे हस्ते पदग्रहण करण्यात आले.

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुपरवायझर वनिता बाबर, क्रीडा शिक्षक पंचाक्षरी स्वामी, आरिफ तांबोळी सह फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका किरण कोडग यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिक्षक अतुल माने यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.