सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरवात सीईओ सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील, फॅबटेक बॅकेचे संचालक अमरजीत पुजारी, सुपरवायझर वनिता बाबर, शिक्षिका विद्या नरूटे, शीतल बिडवे आदीच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता सहावीतील शौर्य नष्टे, श्लोक पतंगे, पियुष दौंडे, आरव पाटील आदी विद्यार्थ्यांनी गुरू बद्दल भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली
याशिवाय इयत्ता सहावीतील विद्यार्थी अधिराज शिंदे, प्रिया सुळे, वृषाली पाटील, श्रेयस सावंत, दक्ष कोळेकर यांनी समुह गीत सादर केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दक्ष कोळेकर व शाश्वत आवताडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार अधिराज शिंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्ग शिक्षिका वर्षा जानकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय देशमुख, क्रीडा शिक्षक पंचाक्षरी स्वामी आदींसह स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.