*फॅबटेक कॉलेज ऑफ पाॅलिटेक्निक च्या ४६ विद्यार्थ्यांची "जाॅन डिअर" कंपनीत निवड*
□ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: प्राचार्य तानाजी बुरूंगले यांची माहिती
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक सांगोला महाविद्यालयातील ४६ विद्यार्थ्यांची "जाॅन डिअर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य प्रा. तानाजी बुरूंगले यांनी दिली.
भारतासह जगभरातील शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी जाॅन डिअर सातत्याने नवनवीन उत्पादन आणि भारताच्या पुरवठा साखळीत इनोव्हेटिव्ह कल्पतेद्वारे गुंतवणूक करणारी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.
"जाॅन डिअर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी महाराष्ट्र (पुणे) आणि मध्य प्रदेश (देवास) या ठिकाणी हि कंपनी उत्पादन करीत आहे. अशा या कंपनीत सांगोला फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक सांगोला मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २१ आणि इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील २५ असे एकुण ४६ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली आहे.
फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक मध्ये शिक्षण घेत असलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळविण्यासाठी आवश्यक असणारे तांत्रिक आणि प्रात्यक्षिक कौशल्य तसेच इंग्रजी संभाषण कौशल्य या महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना दिल्या जातात. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता चाचणी याचीही जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात येते. बोर्डाच्या अभ्यासक्रमात विविध कॉम्प्युटर भाषा ह्या केवळ पाठ्यक्रमाचा भाग न समजता विद्यार्थ्यांना विविध भाषेचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर भारताचा एक सजक नागरीक घडविण्याचे काम फॅबटेक काॅलेज ऑफ पाॅलिटेक्निक सांगोला मध्ये केले जात असल्याने विद्यार्थी व पालक यांचा सर्वाधिक ओढा फॅबटेक पाॅलिटेक्निक काॅलेज कडे आहे.
"जाॅन डिअर प्रायव्हेट लिमिटेड" कंपनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य तानाजी बुरूंगले आदींसह पाॅलिटेक्निक काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.