सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी सांगोला महाविद्यालयाच्या ३ विद्यार्थ्यांनी जी-पॅट २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या ग्रॅज्युएट ॲप्टीट्युड टेस्ट (जी-पॅट) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत सांगोला फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील ऋषिकेश राजेंद्र लेंगरे (एआयआर-४२४०), विनोद हनुमंत साठे (एआयआर-१०२६०) आणि समृद्धी प्रविण चौघुले (एआयआर-१०४९०) यांनी जी-पॅट परीक्षेत यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
जी-पॅट परीक्षेत उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या शैक्षणिक दर्जाची पातळी उंचावली असुन, भविष्यातील विद्यार्थ्यांसाठीही ही एक प्रेरणादायी गोष्ट ठरणार आहे. जी-पॅट परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधनाच्या व्यापक प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत.
जी-पॅट परीक्षेतील उल्लेखनीय यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. संजय बैस, डाॅ. सरफराज काझी, प्रा. कांचन दशरथ आदींसह फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.