फॅबटेक कॉलेज मधील ३ विद्यार्थ्यांची "टाटा ऑटोकाॅम्प सिस्टीम प्रा. लि." कंपनीत निवड

 


सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील २ आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील १ अशा एकूण तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.

    फॅबटेक काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अतुल उत्तरे आणि सुदर्शन घेरडे तसेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील संघर्ष शिंदे यांची "टाटा ऑटोकाॅम्प सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.

    "टाटा ऑटोकाॅम्प सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड" या कंपनीची स्थापना १९९५ साली झाली असुन टाटा ऑटोकाॅम्प, ऑटो-घटक उत्पादन आणि सेवांच्या विविध श्रेणीच्या डिझाईन उत्पादित करणे हे खास वैशिष्ट्य या कंपनीचे आहे. या शिवाय "टाटा ऑटोकाॅम्प सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड" हि कंपनी व्यापार क्षेञात देखील अग्रेसर आहे. अमेरिका, युरोप आणि चीन आदी देशांत या कंपनीचे कार्यालये आहेत. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती हा एक स्वतंत्र टाटा ऑटोकाॅम्पने राबविलेला वाहन घटक व्यवसाय आहे. 

  भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेऊन सांगोला येथील फॅबटेक काॅलेज विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा व नवनवीन अभ्यासक्रमांवर कार्यशाळा आयोजित करून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व औद्योगिक तंत्रज्ञानाशी अनुसरून शिक्षण देत आहे. याशिवाय फॅबटेक महाविद्यालयामध्ये स्वतंत्र ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कंपनीत आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच आज फॅबटेक संस्थेमधील विद्यार्थी कॅनडा सारख्या देशात अभियंता म्हणून शासकीय सेवेत पदभार संभाळत आहेत.

     "टाटा ऑटोकाॅम्प सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड" कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.