फॅबटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मधील ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 

सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक (ता. सांगोला) येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन "सातव स्टोन प्रा. लि. कंपनीत निवड झाली असल्याची माहिती फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी दिली.

सातव स्टोन को. प्रायव्हेट लिमिटेड हि कंपनीचा कार्यकाल हा ५० हून अधिक वर्षाचा आहे. हि कंपनी रेडी मिक्स काँक्रिट, क्रश्ड स्टोन आणि कृत्रिम ड्राय प्लास्टर सॅडचे सर्वात चागंले उत्पादन आणि पुरवठा करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. गुणवत्ता प्रक्रियेसाठी आणि जलद वितरणासाठी हि कंपनी अग्रेसर आहे. अशा या कंपनीत फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील कुमारी पुजा राऊत, कुमारी कोमल कोळी, कु. वैष्णवी शिवाजी लेंडवे, कुमारी रुपाली जाधव, कुमारी विजया माने, कुमारी ऐश्वर्या इंगवले, समरजीत घाडगे आणि साहिल मनेरी आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे. 

    फॅबटेक काॅलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महाविद्यालयात नेहमीच अग्रेसर असुन विद्यार्थ्यांना नामांकित मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी देण्यासाठी फॅबटेक कॉलेज मध्ये संपूर्ण तयारी करून घेतली जाते. याच अनुशंगाने सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील ८ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे

  निवड झालेल्याच विद्यार्थ्यांचे फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.