सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक पब्लिक स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेवरी ॲबॅकस व हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती स्कूलचे उपक्रमशील प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व आकलन क्षमता वाढावी यासाठी फॅबटेक मध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये ॲबॅकस, ऑलिम्पियाड आणि हस्ताक्षर या स्पर्धा घेण्यात आल्या. ॲबॅकस स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमतेची वाढ होण्यास मदत होत असते. विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील ५ ते १० वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी ॲबॅकस स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील ५२ हून अधिक यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य सुधारण्यासाठी इयत्ता १ ली ते ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. दरम्यान ऑलिम्पियाड परीक्षेसाठी प्रेरणा देणारे स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील, ऑलिम्पियाड परीक्षा प्रमुख कोमल पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले .सह ऑलिम्पियाड सर्व विषयांच्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम पब्लिक स्कूलच्या सीईओ सारिका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील, सुपरवायझर वनिता बाबर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक पब्लिक स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरीदा मुलाणी यांनी केले तर कोमल पवार यांनी आभार मानले.