पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी (ता.पंढरपूर) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी "माय स्टोरी मोटिव्हेशनल सेशन बाय सक्सेस फुल इनोव्हेटर्स" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात उद्योजक सुरज डोके यांचे "माय स्टोरी मोटिव्हेशनल सेशन बाय सक्सेस फुल इनोव्हेटर्स" या उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. यादरम्यान उद्योजक सुरज डोके यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख व्याख्याते सुरज डोके हे स्पार्टन टेक्नॉलॉजी या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत.
यादरम्यान सुरज डोके यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक व्हेईकल, इलेक्ट्रिक मोटार, बॅटरी टेक्नॉलॉजी या विविध गोष्टीची वापर करून ई-व्हेईकल कशाप्रकारे तयार करायची याशिवाय विविध प्रकल्प प्राॅडक्ट कसे तयार करू शकतो याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी केले.