*ध्येयक्रांती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय यांचे वतीने स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*
लक्ष्मी दहिवडी: प्रतिनिधी
लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेला महात्मा फुले युवा मंच संचलित, ध्येयक्रांती स्पर्धा परीक्षा ग्रंथालय यांच्यावतीने विविध क्षेञात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती महात्मा फुले युवा मंच संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरवात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याचे पुजन सरपंच अनिल पाटील, डाॅ. आप्पासाहेब पुजारी, हणमंत क्षीरसागर, प्रा. बाळासाहेब बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी हे होते. यादरम्यान उपस्थित मान्यवरांचा डाॅ. राजकुमार बनसोडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सरपंच अनिल पाटील यांचा सत्कार पोलीस विलास बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. बाळासाहेब बनसोडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून महात्मा फुले युवा मंच माध्यमातून रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गोरगरीब कुटुंबाला अन्नात किट, शाळेचे अंतर लांब आहे अशा मुलींना सायकल वाटप आदींसह अनेक सामाजिक उपक्रम युवा मंच माध्यमातून राबविण्यात येत आहे. याशिवाय सामाजिक कार्याबरोबर नोकरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन युवा मंच करत असल्याचे मत प्रा. बाळासाहेब बनसोडे यांनी प्रास्ताविक मध्ये मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डाॅ. आप्पासाहेब पुजारी यांचा परिचय डाॅ. राजकुमार बनसोडे यांनी करून दिला. यादरम्यान ३१ हून अधिक यशस्वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सन्मानचिन्ह, शाल, गुलाब देऊन सत्कार करण्यात आला.
यादरम्यान प्रमुख पाहुणे डाॅ. आप्पासाहेब पुजारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विठ्ठल टाकळे व किशोर वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचा आभार प्रा. बाळासाहेब बनसोडे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले युवा मंच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.