पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये डॉ. एम सुजित यांचे "डिझाईन पेटंट रजिस्ट्रेशन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये डॉ. एम सुजित यांचे "डिझाईन पेटंट रजिस्ट्रेशन" या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ऑनलाइन व्याख्यानाच्या सुरुवातीस डॉ. यशवंत पवार यांनी प्रमुख पाहुणे यांचा परिचय करुन दिला. डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली , प्राचार्य डॉ . कैलाश करांडे यांनी पेटंट बद्दल सगळ्यांना मार्गदर्शन केले.
यादरम्यान डॉ. एम सुजित यांनी डिझाईन पेटंट या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यामध्ये आय पी आर व डिझाईन पेटंट चे महत्व व डिझाईन पेटंट कसे फाईल करायचे याबद्दल ऑनलाईन प्रात्यक्षिक दाखवले.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रा. अमोल कांबळे, प्रा. प्रदीप व्यवहारे, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. उदय फुले, प्रा. अंजली पिसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.