पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात "शाश्वत, टिकाऊ सामग्री आणि उर्जा' या विषयावर मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाच्या सुरुवातीस डाॅ. अतुल आराध्ये यांच्या हस्ते डाॅ. सागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या व्याख्यानामध्ये अभियांत्रिकी तत्त्वांचा अशा प्रकारे वापर करणे समाविष्ट आहे ज्यामुळे संसाधनांचा वापर कमी होतो, प्रदूषण कमी होते आणि नैसर्गिक प्रणालींची दीर्घकालीन व्यवहार्यता सुनिश्चित होते. भावी पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता सध्याच्या गरजा पूर्ण करणे हे प्राथमिक ध्येय आहे. अशा विविध विषयांवर डाॅ. अतुल सागडे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. हे व्याख्यान मेसा कडून आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी प्रा. ऋषिकेश देशपांडे, प्रा. लक्ष्मीकांत जोशी, प्रा. सर्जेराव महारनवर आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग परीश्रम घेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश म्हमाणे व यशराज गवळी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. ऋषिकेश देशपांडे यांनी मानले.