विद्यार्थ्यांच्या मनात बचतीची भावना निर्माण व्हावी- चंद्रकांत भोर



 पंढरपूर सिंहगड मध्ये पोस्ट ऑफिसच्या वतीने आधार कॅम्प संपन्न

पंढरपूर: प्रतिनिधी

१६९ वर्षांचा इतिहास असलेली भारतीय टपाल सेवा फक्त पत्र पाठवण्यापुरती मर्यादीत नाही. पोस्ट ऑफिसतर्फे अनेक बचत योजना देखील राबवल्या जातात. पोस्टातल्या बहुतांश बचत योजना बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा जास्त व्याज देतात. पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुलं आणि वृद्धांसाठी अनेक बचत योजना चालवल्या जातात. यामध्ये अशा ५ योजना आहेत, ज्यांच्याद्वारे तुम्ही चांगलं व्याज मिळवू शकता. अनेक जण अशी जागा शोधत असतात जिथे त्यांचा पैसा सुरक्षित राहील आणि पैशाला व्याज मिळेल

आपण आपल्या भविष्यासाठी पैशांची बचत करतो. आपलं भविष्य सुखकर व्हावं, अडचणीच्या काळात कुणाकडे पैशांसाठी हात पसरायला लागू नये यासाठी आपण पैशांची बचत करतो. याशिवाय आयुष्य जगण्यासाठी पैसे हे फार महत्त्वाचे आहेत. आपल्याजवळ पैसे असणं आवश्यक आहेत. त्यामुळे आपण दर महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे भविष्यासाठी सेविंग करुन ठेवतो. आपण बऱ्याचदा असा साठवून ठेवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्याचा विचार करतो. पण आपण गुंतवलेला पैसा सुरक्षित राहील ना, तसेच चांगला मोबदला मिळेल ना? असा विचार आपण करत असतो. तुम्ही पैशांची गुंतवणूक कुठे करावी? असा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस एक चांगलं माध्यम असुन शैक्षणिक जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनात पैशाच्या बचतीची भावना निर्माण व्हावी असे मत पंढरपूर पोस्ट ऑफिस चे अधिक्षक चंद्रकांत भोर यांनी व्यक्त केले.

    एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पोस्टात खाते व आधार लिंक कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते.

  यामध्ये अधीक्षक डाक घर पंढरपूर चंद्रकांत भोर, सोमनाथ गायकवाड, विष्णू कांदे, बाळू शिंगाडे, दत्तात्रय मुढे, मंगेश सलगर, अजिंक्य यादव, कमलाकर दबडे आदी कर्मचारीवर्ग उपस्थित होते. उपस्थित कर्मचाऱ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन डाॅ. दिपक गानमोटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.