वार्डाच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन.
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक लवकरच जाहिर होईल असे असतानाच वार्ड क्रमांक ४ मधील विजय गजानन पैलवान हे यंदाची नगरसेवक पदाची निवडणूक लढविणार असल्याची माहिती सुञाकडून सांगण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवा कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून विजय पैलवान यांचे कडे पाहीले जाते. सर्व सामान्य जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एक युवा चेहरा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे.
निवडणूक लढविणार असल्याचे संकेत विजय पैलवान यांनी जरे दिले नसले तरी सुञाकडून माञ हि निवडणूक विजय पैलवान लढविणार आहेत अशी गोपनीय सुञाकडून माहिती मिळाली आहे.
सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा आदींसह अनेक प्रश्नांवर मास्टर प्लॅन तयार करून हि निवडणूक विजय पैलवान लढविणार असल्याचे संकेत आहेत.
शांत स्वभाव, निर्णय क्षमता, धाडसी नेतृत्व अन् विकसनशील नगरसेवक वार्ड क्रमांक चार मधील लोकांना मिळणार असल्याने वार्ड क्रमांक चार मधील सर्व सामान्य नागरिक, युवा वर्ग महिलांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.