पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी एआय आणि एमएलमध्ये व्हीएलएसआयवर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. हे वेबिनार प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली.
मावेन सिलिकॉन ही एक अग्रगण्य व्हीएलएसआय (व्हेरी-लार्ज-स्केल इंटिग्रेशन) डिझाइन आणि प्रशिक्षण कंपनी आहे. जी सेमी कंडक्टर डिझाइनमध्ये शिक्षण आणि समाधान प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करते. विशेषत: व्हीएलएसआय डिझाइन, एएसआयसी (ॲप्लिकेशन-स्पेसिफिक इंटिग्रेटेड सर्किट) आणि एफपीजीए (फील्ड-प्रोग्रामेबल गेट ॲरे) डिझाइनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार घेण्यात आले.
या वेबिनार मध्ये सिंधुजा या बंगळुरूच्या मॅवेन सिलिकॉन येथे टेक्निकल ट्रेनिंग प्रमुख आहेत. त्यांच्याकडे फ्रंट एंड व्हीएलएसआय पडताळणीचा १० वर्षांहून अधिक अनुभव आहे.
सिंधुजा यांनी सांगितले की एआय आणि एमएलमधील व्हीएलएसआय (व्हेरी-लार्ज-स्केल इंटिग्रेशन) वरील वेबिनार हार्डवेअर डिझाइन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परस्परसंबंधावर लक्ष केंद्रित करेल, प्रगत चिप डिझाइन एआय आणि मशीन लर्निंग अनुप्रयोगांवर कसा परिणाम करते यावर जोर देईल. या वेबिनारमध्ये अनेक संकल्पना मांडल्या आहेत जसे की एज एआय आणि आयओटीमध्ये व्हीएलएसआयची भूमिका, एआय / एमएलसाठी व्हीएलएसआयमधील भविष्यातील ट्रेंड, करिअर आणि संशोधनाच्या संधी वगैरे.
विद्यार्थ्यांनी हे व्यापक क्षेत्र आणि वास्तविक जगातील अनुप्रयोग समजून घेण्याच्या संधी ओळखल्या आहेत. सिंधुजा यांनी विद्यार्थ्यांना संशोधन आणि विकासासाठी प्रोत्साहन दिले.
ई अँड टीसी विभागाचे एचओडी डॉ. ए. ओ. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.ए.सी.पिसे यांनी या वेबिनारचे आयोजन केले होते. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.