पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी "रिझ्युम तयार करण्याची कार्यशाळा" आयोजित करण्यात आली होती. हा कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या सुरुवातीस सिंम्लीफाईड हैदराबाद येथील कंपनीचे अध्यक्ष व्याख्याते पौर्णा यांचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आले.
या वेळेस पौर्णा यांनी रिझ्युम तयार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती दिली. मुलाखतीच्या प्रक्रियेमध्ये आकर्षक बायोडाटा असणे अत्यंत महत्वाचे आहे.
हि कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील २०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.