पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीच्या संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
यावेळी व्याख्याते अमोल कवडे यांचे विद्यार्थी प्रतिनिधी कुलदीप गोडसे यांनी गुलाब फुल देऊन स्वागत केले. यादरम्यान ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला.
यावेळेस बोलताना अमोल कवडे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या नामांकित विद्यापीठ शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करत असते. अनेक वेळा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी असल्याने परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. यासाठी परदेशातील विद्यापीठाकडून सुमारे २० लाखांपर्यंत आर्थिक साहाय्य उपलब्ध होत असते. याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
या व्याख्यानामध्ये सर्व विभागातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नागनाथ खांडेकर, प्रा. अभिजित सवासे, राजाराम राऊत, अमोल नवले आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.