फॅबटेक पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उत्तुंग भरारी

 


सांगोला: प्रतिनिधी 

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत अथक श्रमाने यश संपादन केले आहे. आपले शरीर निरोगी, आरोग्यदायी रहण्यासाठी सर्व मैदानी खेळ आले पाहिजेत .स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवत असतात. महाराष्ट्र राज्य अथलेटिक्स असोसिएशन व सोलापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा  मैदानी स्पर्धा व राज्य निवड चाचणीत फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे प्राचार्य श्री सिकंदर पाटील सुपरवायझर सौ.वनिता बाबर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हॅमरथ्रो २०वर्ष वयोगटातील मुली कु. ऋतुजा आनंदा पवार  या विद्यार्थीनींने द्वितीय क्रमांक मिळवून ऋतुजा पवार हिची राज्यस्तरीय निवड झाली. कु श्रध्दा नेताजी पाटील हिचा तृतीय क्रमांक आला तर .२० वर्षं मुलांमध्ये कु.आशिष नवनाथ जगताप यांस तृतीय क्रमांक मिळाला यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलचे क्रीडाशिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांचे मार्गदर्शन मिळाले.  संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर ,मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर ,कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय अदाटे, स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.