सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये “अग्निसुरक्षा प्रशिक्षण” ही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .शाळा सुरू असताना जाणवलेले भूकंपाचे धक्के, अचानक लागलेली आग आणि विद्यार्थ्यांची झालेली धावपळ अवघ्या एका मिनिटात संपूर्ण इमारत मोकळी होते, हे दृश्य होते फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये आगीच्या प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या मॉकड्रिलचे. कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या उपस्थितीत अग्निसुरक्षा मॉकड्रिलचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.श्री. प्रतीक गजरे,श्री. निरज गजरे पंढरपूर यांनी आगीपासून बचाव कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले, तसेच नैसर्गिक आपत्ती भूकंपाचे धक्के जाणवल्यावर जीव, वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करावे .आग कशी लागते?,आग लागल्यावर त्वरीत काय करावे?, सुरक्षेसाठी वापरले जाणारे फायर एक्सटिंगविशर म्हणजे काय? हे सांगितले. तसेच सिंगल मॅन रेस्क्यू ऑपरेशन बचाबकार्य.तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी हायड्रनल सिस्टीमचे प्रात्यक्षिक करून दाखविले. स्कूलमधील कर्मचाऱ्यांना अग्नीरोधक कसा वापरावा? भूकंप व आग या नैसर्गिक आपत्तीची वास्तविक परिस्थिती तयार करून मॉकड्रिल घेण्यात आले.कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे यांनी “अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा” प्रात्यक्षिकाबद्दल स्कूलचे कौतुक केले.या अग्निसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेसाठी संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ संजय अदाटे स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.