सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक म्हणजे ज्ञानाचा सागर, शिक्षक जगण्यातून जिवन घडविणारा, तत्वातून मूल्य शिकवणारा शिक्षक होय. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर वर्षा कोळेकर सुपरवायझर वनिता बाबर विद्यार्थी प्राचार्य प्रतीक दुपडे व विद्यार्थी सुपरवायझर मिताली यमगर हे लाभले पाहुण्यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी स्कूल मधील इयत्ता तिसरीतील रुद्राणी ठोंबरे इयत्ता सातवीतील अचल येड्रवकर इयत्ता आठवीतील अदिती घाडगे व स्वराली काळे इयत्ता नववीतील अन्वी कांबळे व अजय पवार यांनी शिक्षक दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली ,तसेच ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. रेशमा तोडकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी गोष्ट सांगितली यानंतर संगीत शिक्षक डॉ. अमोल रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर समूहगीत सादर केले यानंतर कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक सर्वोत्तम विद्यार्थी कसा घडवतो यांचे उदाहरण सांगितले. व कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे यांच्या हस्ते शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या. विद्यार्थी प्राचार्य प्रतीक दुपडे व विद्यार्थी सुपरवायझर मिताली यमगर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर अध्यापन तासिका घेतल्या या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ .अमित रुपनर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कोडक यांनी केले व आभार सौ अनिता शिनगारे यांनी व्यक्त केले.