आयुष्यातील प्रत्येक संकटाला आव्हान म्हणून स्वीकारावे- महादेव घोंगडे

 


सांगोला: प्रतिनिधी

आई वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले पाहिजे. जीवनामध्ये लिहता आले पाहिजे. या लिहिण्यामागे एखादा लेखक, कवी दडलेला असतो. जीवन जगत असताना आपले कष्ट प्रामाणिक असले पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यातील संघर्ष वेगळा आहे. आई वडीलाशी मन मोकळेपणाने बोलले पाहिजे. पैशाचा मोह आज खुप मोठ्या प्रमाणात बोकाळत चालला आहे. पैसा सन्मानाने मिळवता आला पाहिजे. जीवनात पैशाला जास्त महत्व दिले नाही पाहिजे. मैञी चे नाते आयुष्यभर घट्ट ठेवले पाहिजे. आयुष्यात संकट येत असतात त्या प्रत्येक संकटाला आव्हान म्हणून स्विकारावे असे मत महादेव घोंगडे यांनी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी महादेव घोंगडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज नेहमीच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत असते. ग्रामीण जीवन शैली, वास्तव जीवन आणि भविष्यातील करिअर या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृता व्हावी याच अनुषंगानेच पब्लिक स्कूलचे संवेदनाशील प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

  व्याख्यानाच्या सुरुवातीस व्याखाते महादेव घोंगडे यांचे स्कूल च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रमात पब्लिक स्कूल मधील इयत्ता ४ ते १० वी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक निसार इनामदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूल च्या सीईओ सारिका रूपनर, संवेदनाशील प्राचार्य सिकंदर पाटील, उपक्रमशील शिक्षिका सुपरवायझर वनिता बाबर आदींसह पब्लिक स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.