पोलीस बांधवांना राख्या बांधत रक्षाबंधन सण साजरा

 

□ सांगोला फॅबटेक पब्लिक स्कूलचा स्तुत्य उपक्रम 

सांगोला: प्रतिनिधी

रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील मुलींनी सामाजिक बांधिलकी जपत सांगोला शहर पोलीस ठाण्यात जाऊन चेकपोस्टवर असणा-या पोलीस बांधवांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.

     रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण भागाकडे जाऊन भावाल राखी बांधून आपले रक्षणासाठी साकडे घालत असते. माञ कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवाना रक्षाबंधन दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही. यासाठी सांगोला शहराच्या नजीक असलेल्या फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील मुलीनी यापुर्वी सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन कर्तृत्वावर असलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळेस सांगोला पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे, विनायक माहुरकर, श्रीकांत जाधव, पोपट काशिद, सहायक फौजदार मोहन भुजबळ, अनिल बनसोडे, पोलीस अंमलदार रुपेश खटकाळे, कैलास खटकाळे, राजु आवटे, बबलू पाटील, गणेश कुलकर्णी आदीसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना फॅबटेक पब्लिक स्कूल मधील चिमकल्यांनी राख्या बांधल्या.

   हा कार्यक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, स्कूल च्या सीईओ सारीका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील शिक्षिका वनिता बाबर, सुप्रिया फुले, मनीषा पाटील, शिक्षक पंचाक्षरी स्वामी, अविनाश जावीर, आरिफ तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.