□ कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड: वार्षिक ३.५० लाख पॅकेज
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फॅबटेक महाविद्यालयातर्फे कॅम्पस मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या मुलाखतीतून काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील कुमारी प्रतिक्षा अशोकराव जगताप यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली.
अल्पावधीतच सांगोला फॅबटेक महाविद्यालयाने अभियांत्रिकी शैक्षणिक क्षेत्रात दबदबा निर्माण करून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असेलले फॅबटेक महाविद्यालय ऑटोनॉम आहे. महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मानवी अधिकार, मुलभुत अधिकार अबाधित राखून पालकांच्या विश्वास पाञ ठरून विद्यार्थ्यांना तणावमुक्त शिक्षण, गुणवत्ता पुर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणजे सांगोला फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज असा वेगळा नावलौकिक फॅबटेक संस्थेचा आहे
विप्रो हि एक भारतीय बहुराष्ट्रीय नामांकित कंपनी आहे. आयटी सेवा प्रदान करणाऱ्या सहा कंपन्यांपैकी एक आहे. अशा या कंपनीत फॅबटेक इंजिनिअरिंग काॅलेज मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण पुर्ण केलेले कुमारी प्रतिक्षा अशोकराव जगताप यांची विप्रो कंपनी निवड झाली आहे. कंपनीकडून ३.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
विप्रो कंपनीत निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेडंगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. तानाजी धायगुडे, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील प्लेसमेंट समन्वयक प्रा. आतिश जाधव आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.