फॅबटेक फार्मसी मध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

 


सांगोला: प्रतिनिधी

फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी सांगोला महाविद्यालयात शनिवार दिनांक २ व रविवार दिनांक ३ ऑगस्ट २०२५ रोजी एचपीएलसी उपकरण प्रशिक्षण या विषयावर विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची महिती प्राचार्य डाॅ. संजय बैस यांनी दिली.

    फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेची सुरुवातीस व्याख्याते डाॅ. अनिल देवाणी, प्राचार्य डाॅ. संजय बैस, डाॅ. सविता सोनवणे, डाॅ. सरफराज काझी आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. यादरम्यान व्याख्याते डाॅ. अनिल देवाणी या॔चे फार्मसीच्या काॅलेजच्या वतोने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

     या कार्यशाळेत एचपीएलसी उपकरणांची संपुर्ण माहिती कार्यशाळेत सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली. फार्मसी मधील संशोधनामध्ये या उपकरणांची मदत कशी होते. याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यशाळेत देण्यात आले. या कार्यशाळेत फॅबटेक काॅलेज ऑफ फार्मसी सांगोला महाविद्यालयातील अंतिम वर्ष शिक्षण घेत असलेल्या १२० हून अधिक विद्यार्थी व शिक्षक तसेच इतर विविध महाविद्यालयातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

   फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. संजय बैस यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

   या कार्यशाळेचे सुञसंचालन प्रा. कांचन दशरथ यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. सविता सोनवणे यांनी मानले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी फार्मसी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.