सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील इयता नर्सरी ते सिनिअर केजी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगोला येथील सुप्रसिद्ध असलेल्या गायञी मार्ट या उद्योग समूहातील व्यवसायाला अनमोल भेट देऊन व्यवहारिक जीवनातील माहिती घेतली असल्याचे प्राचार्य सिकंदर पाटील यांनी सांगितले.
फॅबटेक पब्लिक स्कूल मधील बाळ गोपाळांची गायत्री मार्ट मध्ये विद्यार्थ्यांनी विविध साहित्य यांचे पॅकिंग कसे तयार केले जाते. प्रत्येक गोष्ट कुठे काय भेटते, ग्राहकाला काय हवे आहे ते विचारलं जाते. या भेटीत विद्यार्थ्यांकडून विचारलेल्या प्रश्नांना गायञी मार्ट मधील कर्मचाऱ्यांनी उत्तरे दिली. या मार्ट मध्ये मुले आनंदात व शिस्ती माहिती घेत होती. मार्ट मधील कोणत्याही वस्तूंची हानी न करता विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.
दरम्यान फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांची शिस्त पाहून गायञी मार्ट कडून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. गेल्या तीन वर्षापासून फॅबटेक पब्लिक स्कूल मधील मुलांना गायत्री मार्ट मध्ये भेट देण्यात येत आहे.
हि भेट स्कूलच्या सीईओ सारीका रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
गायञी मार्ट मधील विद्यार्थ्याची भेट यशस्वी करण्यासाठी स्कूल मधील शिक्षिका रूपाली नलवडे, काजल मिसाळ, मनीषा शिंदे, अनिता शिनगारे, पूजा इंगोले, आयेशा मुजावर, मावश्या सह बसचे ड्राइवर यांनी परिश्रम घेतले.