सांगोला: प्रतिनिधी
भारतामध्ये "बाॅश चॅसिस प्रा. लि." कंपनी हि औद्योगिक तंत्रज्ञान, ग्राहक वस्त्र तसेच उर्जा व इमारत तंत्रज्ञान या क्षेञांमध्ये तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे.
"बाॅश चॅसिस प्रा. लि." कंपनी भारतासह इतर १२ कंपन्यांसोबत कार्यरत आहे. १९५१ मध्ये या कंपनीने उत्पादन सुरू केले होते. अशा या कंपनीत फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेले कुमार ऋषिकेश समाधान भंडारे यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली होती.
ऋषिकेश भंडारे यांची "बाॅश चॅसिस प्रा. लि." कंपनी निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.