□ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात करिअरच्या अनेक संधी
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतले कुमार राहूल बापू मोरे यांची "क्रोमवेल्ड इंडस्ट्रीज प्रा. लि." कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
"क्रोमवेल्ड इंडस्ट्रीज प्रा. लि." कंपनी रासायनिक, औषधनिर्माण, कागद, जीवजंतू विज्ञान, तेल आणि वायू, वेस्ट वाॅटर ट्रीटमेंट तसेच पाॅवर क्षेञात कार्यरत आहे. हि कंपनी चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे आदींसह भारतात स्थित आहे. १३ वर्षाहून अधिक काळ हि कंपनी ऑईल, गॅस तसेच प्रक्रिया उपकरण क्षेञात कार्यरत आहे.
"क्रोमवेल्ड इंडस्ट्रीज प्रा. लि." कंपनीत कुमार राहूल मोरे यांची निवड झाल्याबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. राहूल आवताडे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.