□ फॅबटेक सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये करिअरच्या अनेक संधी
सांगोला: प्रतिनिधी
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केल्यानंतर गौडवाडी (ता. सांगोला) येथील कुमारी विद्या पांडूरंग आलदर यांची बृहन्मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंता पदी निवड झाली असल्याची माहिती संस्थेचे सचिव डाॅ. अमित रूपनर यांनी दिली.
बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत कुमारी विद्या पांडूरंग आलदर ह्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन बृहन्मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंता पदी निवड झाली आहे.
याशिवाय कुमारी विद्या आलदर हिने सातारा जिल्हा परिषद, ग्रामिण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता पदी निवड झाली होती. खंडाळा (जि. सातारा) येथील जिल्हा परिषद ग्रामिण पाणीपुरवठा विभाग येथे २०२४ पासून कार्यरत आहेत. पाणीपुरवठा विभागात कार्यरत असताना त्यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळ सेवा परीक्षेत यश प्राप्त करून दुय्यम अभियंता पदी निवड झाली आहे. बृहन्मुंबई महापालिकेकडून नियुक्त पञ प्राप्त झाल्यानंतर विद्या आलदर ह्या दुय्यम अभियंता पदावरून रुजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे फॅबटेक मधील अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत, नामांकित कंपनीत आपले करिअर करत आहेत.
कुमारी विद्या आलदर यांच्या निवडीबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ. विद्यारणी क्षीरसागर, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. धनंजय शिवपुजे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी, प्रा. शरद आदलिंगे, आई रुक्मिणी पांडूरंग आलदर, भाऊ अजय व विजय पांडूरंग आलदर आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.