फॅबटेक च्या चिमकल्यांचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा

 


सांगोला: प्रतिनिधी 

फॅबटेक (ता. सांगोला) येथील पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांनी आषाढी वारीनिमित्त विठ्ठल रूक्माई व वारकऱ्यांच्या वेषातील दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अशी माहिती फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी संचालक दिनेश रूपनर यांनी दिली

 फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात वारकरी दिंडी उपक्रम साजरा केला. यानिमित्त सजवलेल्या पालखीत विठ्ठल रूक्माई ची प्रतिमा बसवून फॅबटेक टेक्निकल कॅम्पस च्या प्रांगणात रिंगण सोहळा आयोजित केला होता. या दरम्यान फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या उपप्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर व प्रा. प्राजक्ता रूपनर यांच्या अनेक शिक्षक व शिक्षकांनी विठ्ठल रूक्माई च्या प्रतिमेच पूजन करून दर्शन घेतले.

पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचे पारंपरिक पोशाख परिधान केले होते. टाळ, मृदुंग व अभंगाच्या गायनामुळे फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा जोश निर्माण झाला होता. वारकऱ्यांचा वैशिष्ट्यपूर्ण पेहराव, विठ्ठल रूक्माई चा जयघोष, स्कूल मधील शिक्षिका व मुलीनी फुगडी खेळून, अभंगाचा जयघोष करून दिंडी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिंडी सोहळ्यात विद्यार्थी रूपी वारकऱ्यांना स्कूलच्या वतीने खाऊ रूपी प्रसाद देण्यात आला. विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षक व पालकही या दिंडी सोहळ्यात मोठ्यात प्रमाणात सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे पारंपरिक रूढी परंपरेनुसार तसेच वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. शिक्षक शिक्षिकांनी रिंगण करून विठ्ठल विठ्ठलाला या गीतावर वारीतला आनंद घेतला.

     उपक्रमशील असणाऱ्या फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थित पालक वर्गांनी कौतुक करून समाधान व्यक्त केले.  हा उपक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य सिकंदर पाटील आदीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

   दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.