पर्यावरण संवर्धन काळाची गरज- गजानन बनकर

 

*फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये इको क्लबच्या माध्यमातून वृक्षारोपण*

सांगोला: प्रतिनिधी

वसुंधरा दिवस हा प्रत्येक वर्षी २२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणारा वार्षिक कार्यक्रम आहे. या दिवसाचे औचित्य साधून फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये वैजनाथ घोंगडे व गजानन बनकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती फॅबटेक पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ. सिकंदर पाटील यांनी दिली.

 या कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत असलेल्या सरस्वतीचे पूजन करून करण्यात आले. यादरम्यान प्रमुख वक्ते वैजनाथ घोंगडे व माजी नगरसेवक गजानन बनकर, पञकार प्रमोदराजे बनसोडे यांचे स्कूलचे प्राचार्य डाॅ. सिकंदर पाटील यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

"वसुंधरा दिवसाचे" औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात फॅबटेक पब्लिक स्कूल मधील अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

  या कार्यक्रमात बोलताना गजानन बनकर म्हणाले, पर्यावरणाचे समतोल राखणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे. पर्यावरण महत्व विशद करताना नद्यांचे उगमापासून ते संगमापर्यत सर्व जीवनपट सांगितला. पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता त्याकाळी अनेक शहरामधील लोक एकवटले व त्यांनी धोरणकर्त्यांना या विषयी लक्ष देण्यास भाग पाडलं. त्यांच्या या कृतीमुळे तेथे नागरी पर्यावरणवादी चळवळीला आकार आला. सध्याच्या काळात निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे निसर्गाचं संवर्धन आणि संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. केवळ अर्थ डेच्याच दिवशी नव्हे तर अन्य दिवशीदेखील निसर्ग जपला पाहिजे. म्हणूनच, प्रदुषण रोखणे, इतरत्र होणारा कचरा कमी करणं यासारखे लहान लहान बदलांची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. तर, खऱ्या अर्थाने वसुंधरा दिन साजरा होईल. असे मत गजानन बनकर यांनी व्यक्त केले.

 वैजनाथ घोंगडे बोलताना म्हणाले, प्रत्येक नागरिकाने एकच झाड लावून ते जोपासले तर सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल. नदीचा पाञ स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक चळवळीतून नदी स्वच्छता मोहिम स्वतः राबवली असल्याची माहिती दिली. पर्यावरणाचे संवर्धन हे लोकसहभागातून होणे आवश्यक आहे. शुद्ध पाणी शुध्द हवा हवी असेल तर वृक्ष संवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे मत वैजनाथ घोंगडे यांनी फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये बोलताना व्यक्त केले.

 या कार्यक्रमा दरम्यान स्कूल परीसरात वृक्षारोपण करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. वनिता बाबर, प्रा. विद्या नरूटे, प्रा. वर्षा कोळेकर आदीसह स्कूल मधील सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. किरण कोडक यांनी केले तर आभार प्रदर्शन रेश्मा तोडकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.